मर्जी तुमची, शिकू आम्ही.
मे महिन्यात मातीतील पाणी , ईसी आणि तापमान मोजणारे गॅलिलिओ आम्ही आपणासोबत शेअर केले होते.
मध्यंतरी या विषयावर भरपूर काम झाले.
आता लवकरच, अद्यावत असे डिव्हाईस (Galileo Soil Sensor) घेऊन आम्ही येत आहोत, ज्यात मर्जी चालेल तुमची.
शेती मधे सगळ काही परफेक्ट अस नसते. पावलोपावली, शेतातल्या शेतात आणि गावागावानुसार माती बदलत जाते, पिके बदलतात, आणि पिक संगोपनाच्या पध्दती बदलतात. हंगाम बदलतो, माती बदलत असते.
Galileo: Soil Moisutre, Soil EC, Soil Temeperature
या सर्व बाबींचा विचार करुनच, नवीन गॅलिलिओ मधे आपणास कुठेही चुक वाटते आहे, तर ती दुरुस्त करुन, आज्ञाधारक शिष्यासारख गॅलिलिओ आता शिकणार आहे, स्वतः मधे बदल करुन घेणार आहे.
त्या सोबतच आम्ही पिकावरिल किड व रोग तसेच पिक पक्वता यास अनुषंगुन हवेतील तापमान आणि आर्द्रता मोजून पिक संरक्षण तसेच पिक संगोपनाच्या बाबतीत निर्णय घेण्यात मदत करु शकेल असा दुसरा एक आज्ञाधारक डिव्हाईस देखील तयार केला आहे.
आपण शिकवायचे आणि या दोघांनी शिकायचे.
आमच्या मुलभूत तत्वांना अनुसरून, सतत बदलणा-या परिस्थितीत शेतीत थंब रुल हा मांडणे फार अवघड आहे.
एअर सेंसर बाबत अभ्यास करत असतांना भरपूर काही शिकायला मिळाले.
जगभरातील शास्रज्ञ असे संशोधन करण्यात व्यस्त आहेत जे सर्वसामान्य वर्गाला अंमलात आणता येईल, हि अस्पष्ट असलेली बाजू देखील कळाली.
आपल्या मर्जी नुसार, तज्ञांच्या मर्जी नुसार, आपल्या गरजेनुसार स्वतः मधे सुधार करु शकेल असा आज्ञाधारक डिव्हाईस घेऊन आम्ही लवकरच आपल्या सेवेत रुजू होत आहोत.
आमच्या तर्फे काही एअर डिव्हाईस आम्ही, महाराष्ट्र राज्यातील काही भागात मोफत बसवून देणार आहोत.
ज्याचा डाटा हा तज्ञ सल्लागार, दुकानदार, कंपनी प्रतिनिधी, शेतकरी असा सर्वांसाठी मोफत उपलब्ध असेल, जेणे करुन हि रिअल टाईम माहिती वापरुन तज्ञ आणि अनुभवी मंडळी त्यांच्या अनुभवाचा शेतकरी वर्गास अजुन जास्त फायदा करुन देवू शकतील.
अजुन थोडे काम बाकी आहे.
मोठ्या कंपन्या मधे जे काम करायला अनेक लोक असतात, त्या तुलनेत आम्ही फारच छोटी टिम यावर काम करतोय.
त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो.
हत्ती तयार झालाय, शेपूट बाकी आहे असच आहे जणु काही.
सर्वात महत्त्वाचे आमच्या सिद्धांतानुसार, तंत्रज्ञान हे सर्वांनाच परवडणारे असावे आणि अचुकतेच्या जवळ असावे हाच प्रयत्न आहे.
सर्कल वरिल माती आणि खत व्यवस्थापन या कोर्स मधे दरम्यानच्या काळात अपडेट नाही देवू शकलो त्या बद्दल माफी मागतो. आपण जे सहकार्य केले त्या बद्दल मनापासून आभार.
आपले आर्शिवाद आणि शुभेच्छा अशाच पाठीशी असु द्याव्यात.
गॅलिलिओच्या विशेषतांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि आपल्या शेतासाठी याचा कसा फायदा होऊ शकतो हे पाहण्यासाठी येथे भेट द्या.
Don’t forget to follow us on Instagram @averi.in for the latest updates, exclusive content, and more from the world of Averi!
Add comment