पिक संरक्षण : किटकनाशके, बुरनाशके, तणनाशके या बाबत परिपुर्ण माहीती.
एखादे बुरशीनाशक अगर किटकनाशक केवळ किती वापरावे आणि कोणत्या रोगा अगर किडीसाठी वापरावे ईतकीच माहीती नाही तर, कार्यपध्दती, कार्याचे स्वरुप, पर्यावरणावर होणार परिणाम, पिकावर होणारा परिणाम, मानवावार होणारा परिणाम, प्रतिकारक शक्ती व्यवस्थापन (FRAC) , प्रमुख रोग व किडिंच्या बाबतीत सविस्तर माहीती, रोगात प्रतिकारक शक्ती कशी निर्माण होते, ती होवु नये म्हणुन काय करता येण्यासारखे आहे हि आणि अजुन बरिच माहीती आहे. प्रत्येक रासायनिक घटक हा शक्य तेवढ्या विस्तृत पध्दतीने विवेचन केला गेला आहे. रासायनिक, तसेच जैविक किटकनाशके आणि बुरशीनाशके ह्यांचे बाबत माहीती देतांना ती, कोणत्या पिकासाठी कधी आणि किती प्रमाणात वापरावे ह्या बाबतीत अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत, मात्र ह्याच्या सोबतच शक्य होईल तेथे त्या घटकाच्या बाबातीत त्याची कार्य पध्दती, त्याचे विशेष असे गुणधर्म तसेच ईतर देशात त्याबाबत उपलब्ध असलेले ज्ञान ह्याची देखिल माहीती देण्यात आलेली आहे. केवळ कोणते बुरशीनाशक अगर किटकनाशक किती प्रमाणात वापरावे ह्याची सार्वजनिक डोमेन मधे उपलब्ध असलेली माहीती न देता, प्रत्येक बुरशीनाशक अगर किटकनाशक बाबत सविस्तर माहीती देण्यात आलेली आहे. बुरशीनाशक अगर किटकनाशक वापरण्याची शिफारस हि भारतातील प्रमुख नियंत्रण संस्था आणि जगभरातील संस्था ह्यांचा देखिल आधार घेतला गेला आहे. लेबल क्लमे असलेली बुरशीनाशके आणि किटकनाशके वापरण्यात ह्या मुळे मदत होणार आहे. काही बुरशीनाशकांच्या वापरा बाबत आपणास माहीती असते मात्र ते बुरशी च्या कोणत्या अवस्थेवर कार्य करते हे जर माहीती असले तर बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक बुरशीनाशकांमधुन योग्य वेळी योग्य बुरशीनाशक निवडण्यात मदत होईल अशा अनुषंगाने माहीती देण्यात आलेली आहे.
Reviews
There are no reviews yet.